ना. आकाश दादा फुंडकर यांचे हस्ते लायन्स एक्सपो चे उद्घाटन
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव ; लायन्स क्लब खामगाव द्वारा दरवर्षी लायन्स एक्सपो चे आयोजन केले जाते. यावर्षी सदर आयोजन 12 ते 17 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. या एक्सपोचे उद्घाटन कामगार मंत्री मा ना आकाश दादा फुंडकर यांचे हस्ते दिनांक 12 फेब्रुवारी 2026 गुरुवार रोजी सायंकाळी 6.30 वाजता संपन्न होणार आहे. भव्य दिव्य अशा लायन्स एक्सपो मध्ये लहान मुलांकरिता झुला,360 डिग्री, आकाश पाळणा, ड्रॅगन जम्पिंग पॅड, इत्यादी विविध खेळणी सह यावर्षी सर्कस चे विशेष आकर्षण राहणार आहे. नागरिकांसाठी विविध खाद्यपदार्थाच्या मेजवानी पासून दैनंदिन वापराच्या उपकरणासह विविध कपडे, फॅशन क्रिएशन, हैडीक्राफ्ट, हँडमेड क्रिएशन्स, मेकअप च्या वस्तू, आर्टिफिशियल व नैसर्गिक ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक गुड, रेडीमेड फॅशन, हेल्थकेअर हर्बल प्रोडक्ट इत्यादी सह फुलझाडांची नर्सरी उपलब्ध राहणार आहे. टू व्हीलर बाइक पासून ते फोर व्हीलर व्हेईकल पर्यंत सर्व प्रकारच्या विविध वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री हे या एक्सपोचे वैशिष्ट्य आहे. या सोबतच सर्व लहान मोठ्यांच्या मनोरंजनाकरिता विविध स्पर्धा, नृत्य स्पर्धा, गायन स्पर्धा, स्कीट, माइम्स, गेम, क्वीज इत्यादीचे आयोजन एक्सपो मध्ये करण्यात आले आहे. तरी दिनांक 12 ते 17 फेब्रुवारी दरम्यान शासकीय तंत्रनिकेतन मैदानावर आयोजित ह्या एक्सपोचा या पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी आपल्या परिवारासह व इष्टमित्रासह आस्वाद घ्यावा व आपल्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनामधून आनंदमय क्षण अनुभवावा असे आवाहन लायन्स एक्सपो चेअर पर्सन लॉ डॉ निखिल लाठे, समन्वयक लॉ शंकर परदेशी, सचिव लॉ डॉ धनंजय तळवणकर, कोषाध्यक्ष लॉ राजेंद्र झांबड, लायन्स क्लब अध्यक्ष लॉ तुषार कमानी, क्लबसचिव ला डॉ गिरीश पवार, कोषाध्यक्ष लॉ कुणाल भिसे, व सर्व लॉयन्स क्लब पदाधिकाऱ्यांनी केले आहे. एक्सपोचे आयोजन लायन्स क्लब चे आधारस्तंभ लो अनिल नावंदर, पास्ट डिस्टिक गव्हर्नर लॉयन डॉ अशोक बावस्कर, लॉ रमेश भुतडा यांचे मार्गदर्शनाखाली होत आहे.


إرسال تعليق