बुलढाणा जिल्हास्तरीय मास्टर्स योगासन निवड चाचणी 



जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव - बृहन महाराष्ट्र योग परिषद, अमरावती व महाराष्ट्र योगासन अँड स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यस्तरीय योगासन स्पर्धा दिनांक १३ ते १५ मार्च २०२६ या कालावधीत विभागीय  क्रीडा संकुल, गारखेडा, छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत. त्याकरिता बुलढाणा योगासन अँड स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील ४५ ते ५५,  ५५ ते ६५ आणि ६५ ते ७५ वर्ष वयोगटातील स्त्री-पुरुषांची निवड चाचणी रविवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता डॉक्टर निकम यांचे हॉस्पिटल, जांभरुण रोड, बुलढाणा येथे आयोजित करण्यात आलेली आहे. ज्यांना मास्टर्स योगासन निवड चाचणीमध्ये भाग घ्यायचा असेल त्यांनी  जिल्हा अध्यक्ष डॉ. पी. आर. उपरवट मो. नंबर ९८५०२८११५०  व जिल्हा सचिव डॉ. वैशालीताई निकम बुलढाणा यांचेशी  ९४२४०५७५९९  या भ्रमणध्वनीवर  संपर्क साधावा.  तसेच माहितीपत्रक तथा अभ्यासक्रम यासाठी डॉ. तृप्ती काटेकर (चिखली), डॉ. प्रेमराज वाकोडे (मेहकर) यांच्याशी संपर्क साधावा, असे संघटनेच्या वतीने कळविण्यात आलेले आहे.

Post a Comment

أحدث أقدم