संत गजानन बहुउद्देशीय संस्था पारस ला राष्ट्रीय कला गौरव पुरस्कार प्रदान
![]() |
| पुरस्कार स्वीकारताना चंदाताई ददगाळ |
बुलढाणा फिल्म सोसायटी राष्ट्रीय कला गौरव पुरस्कार संत गजानन बहुउद्देशीय संस्था पारस यांना देण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष सौ चंदाताई सुरेश ददगाळ यांनी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. वाडेकर फिल्म तर्फे विविध क्षेत्रातील गुणवंत व्यक्तींचा रविवार दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी पत्रकार भवन बुलढाणा येथे राष्ट्रीय कला गौरव पुरस्कार साठी गौरविण्यात आले. पारस येथील सामाजिक क्षेत्रात नावाजलेले व्यक्तिमत्व चंदा सुरेश ददगाळ यांना गौरविण्यात आले. यावेळी चित्रपट कलावंत मोहन काळे , नाट्य व चित्रपट कलाकार सुभाष बावस्कर अभिनेते व पत्रकार रफिक कुरेशी नाट्यकलावंत गणेश तांगडे संस्थापक अध्यक्ष भास्कर वाडेकर आदींच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले .

إرسال تعليق