युगधर्म पब्लिक स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा



जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव - युगधर्म पब्लिक स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन मोठ्या आनंदाने व उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे प्राचार्य यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक  (कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला

यानंतर शाळेचे प्राचार्य श्री. अनिरुद्ध अवचार यांनी मराठी भाषेचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी मराठी भाषेचा समृद्ध वारसा तसेच कुसुमाग्रज यांच्या साहित्यिक कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

कार्यक्रमात मराठी विषयाच्या शिक्षिका पूजा तायडे मॅडम तसेच शिवाजी सर यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक उपक्रमांद्वारे कार्यक्रमाची शोभा वाढवली. इयत्ता पहिली व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर मराठी कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगीता देशमुख कु. कांचन लोखंडे जयश्री बुंदेले तसेच इतर शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. सर्वांच्या सहभागामुळे कार्यक्रम आनंददायी वातावरणात  पार पडला

Post a Comment

Previous Post Next Post