महाशिवरात्री निमीत्त श्री नवयुवक मानाची कावड यात्रा वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन

खामगांव :- बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासीक श्री नवयुवक मानाची कावड यात्रा वतीने मंडळाचे संस्थापक अध्यक्ष  राहुलभाऊ कळमकार यांच्या नेतृत्वाखाली महाशिवरात्रीचे पवित्र दिनी  दरवर्षी प्रमाणे यंदाही  भव्य शोभायात्रेचे आयोजन रविवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी करण्यात आले आहे विशेष म्हणजे यावर्षी  शोभायात्रा हि महिलांचे नेतृत्वाखाली निघणार असून या शोभायात्रेत शेकडो महिला भगीनी सहभागी होणार आहेत.

दि. १५ फेब्रुवारी रोजी श्री नवयुवक मानाची कावड यात्रा मंडळाचे वतीने तिर्थक्षेत्र नागझरी येथून पवित्र जल आणण्यात येणार आहे व सकाळी ७ वाजता  राठी प्लॉट भागातील जय शिव शंभो महादेव मंदिरात जलाभिषेक व दुग्धाभिषेक करण्यात येणार असून त्यानंतर  शहरातील पाच मुख्य श्री महादेव मंदिरात जलाभिषेक करण्यात येणार आहे. शोभायात्रा सायंकाळी ६ वाजता निघणार असून तत्पुर्वी  दुपारी १२ ते ३ शिव आराधना व भजन, त्यानंतर दुपारी ३ ते सायं. ६ दरम्यान राठी प्लॉट, दाल फैल भागातील शिव मंदिरात फराळ व दुध  वाटप करण्यात येणार आहे.  सायंकाळी ६ वाजता राज्याचे कामगार मंत्री ना. अ‍ॅड. आकाशदादा फुंडकर, शहराच्या पहिल्या नागरीक नगराध्यक्षा सौ. अपर्णाताई सागरदादा फुंडकर, युवा सेना बुलढाणा जिल्हा प्रमुख ऋषीकेश प्रतापराव जाधव, भाजपा गट नेता मा श्री विजय भाऊ उगले,शिवसेना नेते अमोलभाऊ अंधारे, नगरसेवक राकेशभाऊ राणा, शिवसेना बुलढाणा उपजिल्हा प्रमुख संजय अवताळे, श्री संत गजानन महाराज मंदिर, दाळफैल चे अध्यक्ष राज देशमुख  आदी मान्यवरांंचे हस्ते  महाआरती करण्यात येणार असून त्यानंतर शोभायात्रेला सुरूवात होईल. शोभायात्रेत  श्री भगवान शंकर आणि पार्वतीमाता यांचा जीवंत देखावा देखील सादर केल्या जाणार आहे. 

महाशिवरात्री उत्सवाकरीता सौ. संगीताताई अशोक शिराळ यांचे मार्गदर्शनाखाली  महिलांची कार्यकारिणी तयार करण्यात आली असून या करीता ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. यावेळी श्री नवयुवक मानाची कावड यात्राचे संस्थापक अध्यक्ष राहुलभाऊ कळमकार , श्री गजानन महाराज मंदिर अध्यक्ष राज देशमुख, प्रल्हादकाका ढोले, शंकरकाका खिरडकर, उत्तममामा धारतरकर, सुनिलभाऊ बोडखे हे उपस्थित होते. ईश्वरचिठ्ठी मध्ये ज्या महिला भगीनींची नांवे निघाली त्यात  अध्यक्ष - सौ. छायाताई कोरकणे , उपाध्यक्ष - नेहाताई खुळे , सचिव- सौ. दिपाताई मानेकर, सहसचिव- सौ. पुनमताई देशमुख , सल्लागार - प्राचीताई खोपाले , कोषाध्यक्ष - श्रीमती प्रमिलाताई मोरे, प्रमुख व्यक्ती सौ. लिलाताई मोरे,  सदस्य -  सौ. नर्मदाताई मोरे, सौ. अलकाताई मोरे  समावेश आहे. सदर शोभायात्रा सायंकाळी ६ वाजता राठी प्लॉट, दाल फैल भागातून निघणार असून वर्‍हाडे चौक, राणा गेट, फरशी, सुटाळपुरा, महाकाल चौक, मुक्तीधाम स्मशानभुमी येथे महापुजा करून शोभायात्रेचा समारोप होणार आहे. 

तरी या सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहुन शोभायात्रेत सहभागी व्हावे अशी विनंती श्री नवयुवक मानाची कावड यात्राचे संस्थापक अध्यक्ष राहुलभाऊ कळमकार यांनी केली आहे.  


Post a Comment

Previous Post Next Post