निवडणूक झाली जिंकूनही आणला

पण आता "मेंबरमियांचा" मोबाईल 'नो रिस्पॉन्स'

खामगाव:-नगरपालिका निवडणुकीच्या वेळी घर आणि घर पिंजून काढणारा चेहरा आता जिंकून आणला खरं पण नागरिकांचे कामे करण्यासाठी तो निष्फळ ठरत आहे. कारण सकाळ दुपार संध्याकाळ केव्हाही "मेंबरमियांचा" मोबाईलवर कॉल करा तो "नो रिस्पॉन्स" मिळतो त्यामुळे नागरिकांची कामे रखडल्या जातात आणि शेवटी निवडून दिल्याबद्दल कपाळावर हात ठेवण्याची वेळ येते. 

खामगाव येथील एका मोठ्या प्रभागातील हा "मेंबरमियां" आहे. "चलती गाडी मे बैठने वाला" असे या मेंबरमियांची आता नवीन ओळख निर्माण व्हायला लागली आहे.या "मेंबरमियां" च नाव देखील आम्ही काही दिवसातच प्रसारित करणार आहोत. आणि नागरिकांच्या समस्या देखील वरिष्ठांच्या कानावर घालणार आहोत. नागरिकांना आपल्या समस्या सोडविण्यासाठी पक्षश्रेष्ठी आहेत. परंतु अशा नगरसेवकांची कान उघडणे पक्षश्रेष्ठींनी करावी अशी अपेक्षा सामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post