शासकीय तंत्रनिकेतन खामगांव येथे शिवजयंती निमित्त पदयात्रेचे आयोजन संपन्न

जनोपचार नेटवर्क खामगाव :- भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयामार्फत "मेरा भारत" (MY Bharat) अंतर्गत गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ठिक १०-३० वाजता शिवजयंती निमित्त जिमखान्याद्वारे "पदयात्रा" आयोजित करण्यात आली होती. सर्वप्रथम संस्थेचे प्राचार्य डॉ समीर प्रभुणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर संस्थेतील उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी महाराजांच्या प्रतिमेला आपली श्रद्धासुमने वाहिली. यावेळेस           प्रा नितीन सोनी यांनी महाराजांच्या गौरवशाली कार्यावर प्रकाश टाकला. तद्नंतर सर्व उपस्थितांची पदयात्रा काढण्यात आली.


पदयात्रेच्या सुरुवातीला आणि समापनाला अणूविद्युत विभागाच्या श्री करण घाटोळ या विद्यार्थ्याने जोशपूर्ण स्वरूपात शिवगर्जना दिली, ज्यामुळे सर्व उपस्थितांच्या नसा स्फुरण पावल्या.   या पदयात्रेत प्रा विजय आटोळे आणि विद्यार्थ्यांद्वारे उत्साहवर्धक घोषणा देण्यात आल्या. सदर पदयात्रा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने जिमखाना उपाध्यक्ष प्रा सागर जुमडे, सचिव प्रा रंगनाथ गिऱ्हे, श्री दिनकर सपकाळ, श्री अजय कुंडेटकर आणि इतर सहकाऱ्यांद्वारे आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमाचा उद्देश युवकांना छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखविलेल्या शौर्य, सुशासन व राष्ट्र निर्मितीच्या आदर्शांशी पुन्हा जोडणे हा होय. या उपक्रमाचे व्यापक स्वरूप लक्षात घेता प्राचार्य डॉ समीर प्रभुणे यांनी आव्हानित केल्याप्रमाणे संस्थेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. सदर माहिती एक प्रसिद्धी पत्रकाद्वारे संस्थेचे जनसंपर्क अधिकारी प्रा राजेश मंत्री यांनी कळविलेली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post