शेलोडीचा कुंटणखाना..कर्मचारी मुख्यालय रवाना.....

कर्मचाऱ्यावर झालेल्या कारवाईमुळे अनेकांचे मनोबल डाऊन !

जनोपचार  न्यूज नेटवर्क खामगाव: खामगाव लगत सुरू असलेल्या शेलोडी कुंटनखाण्यावर छापा प्रकरणानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आपल्या अधिनस्त अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांची केलेली उचलबांगडी एक प्रकारे चुकीची झाली असून इतर कर्मचाऱ्यांचे मनोबल डाऊन करणारी असल्याची चर्चा पोलिस वर्तुळाल ऐकिवास मिळत आहे. इन मीन महिनाभर चार्ज घेऊन झालेल्या कर्मचाऱ्यांवर झालेली "मुख्यालय जमा" ची कारवाही योग्य की अयोग्य या बाबत ही चर्चा सुरू आहे.या प्रकरणाशी संबंधित  हेड पोलिस कॉन्स्टेबल किरण राऊत यांनी आता पर्यंत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, DSB , महामार्ग, खामगाव शहर, शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये सुमारे ३० वर्ष सेवा दिली.यात त्यांना आपल्या चांगल्या कामाची पावती म्हणून ७२रिवार्ड देखील मिळाले आहेत.अशा सेवा प्रिय कर्मचाऱ्याला मुख्यालय जमा करणे म्हणजे एक प्रकारे अयोग्य असून इतर कर्मचाऱ्यांच्या मनोबलाचे खच्ची करणच आहे असेही बोलल्या जात आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी त्यांना पूर्ववत रुजू करून घ्यावे अशी अपेक्षा दबक्या आवाजात व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post