ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारूक यांच्या निवासस्थानी ईदच्या निमित्ताने पत्रकारांनी घेतला शीर खुरमा चा स्वाद

खामगांव :- २३ मार्च २०२६ रोजी, रमजान ईदच्या निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारूक यांच्या निवासस्थानी शीर खुरमा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार डॉ. राजेश राजोरे, जगदीश अग्रवाल, सागर मोदी, किशोर भोसले, कुणाल देशपांडे, शिवाजी भोसले, मोहम्मद रियाज , नूर शाह, संभाजी टाले, धनंजय वाजपेयी, नितेश मानकर , शरद देशमुख , मुबारक खान, सिद्धांत उंबरकर, किरण मोरे, मोहम्मद अतहर उर्फ ​​बबलू भाई आणि इतर मान्यवर उपस्थित होते. सर्व पत्रकारांचे अत्तर आणि गुलाबा पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच, ज्येष्ठ पत्रकार डॉ. राजेश राजोरे यांना पत्रकारितेतील डॉक्टरेट मिळाल्याबद्दल बुके  देऊन सत्कार  करण्यात आले. आपले विचार व्यक्त करताना, डॉ. राजेश राजोरे यांनी शीर खुरमा पार्टीला एक चांगला उपक्रम म्हटले. त्यांनी पत्रकारिता क्षेत्रातील पत्रकारांचे प्रकारही स्पष्ट केले. या प्रसंगी, मोहम्मद रियाज , असलम परवेज खान, मजीदखान  , मोहम्मद उमर दराज, मोहम्मद फहद, मोहम्मद ओवैस, मोहम्मद तारिक, मोहम्मद जिब्रान आणि मोहम्मद अदनान यांनी शीर खुरमा पार्टी यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.



Post a Comment

Previous Post Next Post