नाना-नानी पार्कमध्ये तिकीट ; ज्येष्ठांसाठी मोफत प्रवेशाची मागणी

जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव : शहरातील नाना-नानी पार्कमध्ये प्रवेशासाठी आकारल्या जाणाऱ्या तिकीटामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आलेल्या या उद्यानात प्रवेश शुल्क आकारणे अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

दररोज विरंगुळ्यासाठी  व शत पावली साठी येणाऱ्या वृद्धांना आर्थिक भार सहन करावा लागतो, त्यामुळे किमान त्यांना तरी विनामूल्य प्रवेश द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم