जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती ॲक्शन मोडवर....

अर्जदार गुलजमा शहा यांना मिळाले पत्र

जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव:- गुलजम्मा शहा यांनी दाखल केलेल्या अर्जावर जिल्हा जात प्रमाणपत्र समिती हरकतीत आली असून 18 मार्च रोजी दस्ताऐवजासह हजर राहण्याचे पत्र गुलजम्मा शहा यांना मिळाले आहे.

या पत्रात नमूद आहे की,ज्याअर्थी, मोहम्मद ईसा मोहम्मद मुसा यांना जाती प्रमाणपत्र देण्यासंदर्भात आपण आक्षेप अर्ज दाखल केला आहे. त्यासंदर्भात आपणास दि. 18.03.2026 रोजी वेळ. दु. 12.00 वाजता त्यासंदर्भात तुम्ही जिल्हा जात प्रमाणपत्र पडतळणी समिती, बुलडाणा या कार्यालयात आपल्या तक्रारी संदर्भात असणाऱ्या दस्तएवजासह हजर राहावे, दिलेल्या दिवशी तुम्ही जर नमुद केलेल्या कार्यालयात हजर राहु शकला नाहीत. तर आपला आक्षेप अंतिम रित्त्या एकतर्फी निकाली काढण्यात येईल.




Post a Comment

أحدث أقدم