जळगाव जामोद येथे देशी पिस्तुलसह तिघांना अटक; 1.22 लाखांचा मुद्देमाल जप्त

बुलढाणा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जळगाव जामोद पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. अवैध देशी बनावटीचे पिस्तुल बाळगून त्याची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना पोलिसांनी रंगेहात पकडले.

गोपनीय माहितीनुसार, 1 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव जामोद परिसरात सापळा रचून कारवाई केली. यात पवन इंदरसिंग डावर (वय 23, रा. राजूर बk.) संजय भिलारसिंग बोढल (वय 20, रा. राजूर बk.)रमेश दुर्गासिंग बारेला (वय 24, रा. इस्लामपूर)यांना ताब्यात घेण्यात आले.आरोपींकडून देशी बनावटीचे 1 पिस्तुल (मॅगझिनसह)2 जिवंत काडतुसे1 होंडा शाईन मोटारसायकलअसा एकूण 1,22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात आर्म्स अ‍ॅक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

Post a Comment

أحدث أقدم