शेगावात ‘श्री राम कथा’ सोहळ्याचे आयोजन
शेगाव (जि. बुलडाणा) : शेगाव शहरातील भाविकांसाठी एक आध्यात्मिक पर्वणी ठरणारा ‘श्री राम कथा’ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या मंगलमय सोहळ्यामुळे शहरात भक्तीमय वातावरण निर्माण होणार आहे.हा कार्यक्रम दि. २४ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आला असून दररोज सायंकाळी ५.०० ते रात्री ८.०० या वेळेत कथा होणार आहे.कार्यक्रमाचे स्थळ श्रीराम नगर, रेल्वे स्टेशन रोड, HDFC बँकेसमोर, शेगाव असे आहे. या कथामालेतून भगवान श्रीराम यांच्या जीवनचरित्रावर आधारित विचार आणि अध्यात्मिक संदेश भाविकांना मिळणार आहेत.
![]() |
| Advt. |
या सोहळ्यात दररोज उपस्थित राहणाऱ्या भाविकांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून, कथा दरम्यानच भोजन कूपनचे वितरणही केले जाणार आहे.या कार्यक्रमात श्री श्री १००८ महामंडलेश्वर साध्वी सत्यप्रिया गिरी आणि श्री तपोनिधी निरंजनी अखाडा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.या ‘श्री राम कथा’ सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी शेगाव व परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक गुरु गजानन आध्यात्म परिवार, शेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.


إرسال تعليق