अंबाई सेवाभावी संस्थेतर्फे चंदाताई ददगाळ यांचा गौरव
अमरावती:अंबाई सेवाभावी संस्थेच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी चंदाताई ददगाळ यांना जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मातृ सन्मान पुरस्कार २०२६ देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार आमदार सुलभाताई खोडके आणि संस्थेच्या अध्यक्षा माधुरी चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
महिला सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकी जपत चंदाताईंनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना हा गौरव देण्यात आला. यावेळी आमदार सुलभाताई खोडके यांनी चंदाताईंच्या कार्याचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या अध्यक्षा माधुरी चव्हाण यांनीही संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देत चंदाताईंच्या कार्याचा गौरव केला.
या सन्मान सोहळ्याला संस्थेचे इतर पदाधिकारी, सदस्य आणि मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंदाताई ददगाळ यांनी या पुरस्काराबद्दल आमदार महोदयांचे, अध्यक्षांचे आणि संस्थेचे मनापासून आभार मानले.

إرسال تعليق