बाळापुर बायपास ते टीएमसी मार्गावरील गतिरोधक धोकादायक
खामगाव :- बाळापुर बायपास ते टीएमसी दरम्यान रस्त्यावर बसविण्यात आलेले गतिरोधक सध्या अपघाताला आमंत्रण देत असल्याचे चित्र दिसत आहे. संबंधित गतिरोधकावर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या नसल्यामुळे वाहनचालकांना ते वेळेवर दिसत नाहीत.विशेषतः चारचाकी व दुचाकी वाहनचालक या गतिरोधकावर अचानक आदळत असून त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दररोज या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक व नागरिकांची वर्दळ असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.
स्थानिक नागरिकांनी याबाबत चिंता व्यक्त करत सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देऊन गतिरोधकांवर पांढऱ्या पट्ट्या माराव्यात, अशी मागणी केली आहे. योग्य वेळी उपाययोजना न केल्यास गंभीर अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


Post a Comment