शिवांगी बेकर्स कंपनीत कामगार सुविधांबाबत गंभीर तक्रारी
खामगाव (बु. प्र.) : खामगाव तालुक्यातील. (शिवानी बेकर्स) कंपनीत कामगारांना आवश्यक सुविधा योग्य पद्धतीने दिल्या जात नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. यामुळे कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीत कामगारांना सुरक्षा साधनांची कमतरता भासत आहे. सेफ्टी शूज, फेस मास्क, हातमोजे यांसारख्या मूलभूत सुरक्षा साहित्याचा पुरवठा अपुरा असल्याची तक्रार करण्यात आली आहे. तसेच औद्योगिक सुरक्षा व आरोग्य नियमांचेही उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
दरम्यान, कामगारांनी प्रशासनाकडे योग्य कारवाईची मागणी केली असून, सुरक्षित व आरोग्यदायी कामाचे वातावरण मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

إرسال تعليق