कराओके सिंगर्स क्लब खामगावचा आठवा कार्यक्रम उत्साहात संपन्न
सहभागी गायक-गायिकांनी विविध प्रकारची गीते सादर करत प्रेक्षकांची मनं जिंकली
खामगाव : कराओके सिंगर्स क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आठवा संगीत कार्यक्रम काल तुळजाई हॉलमध्ये उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सहभागी गायक-गायिकांनी विविध प्रकारची गीते सादर करत प्रेक्षकांची मनं जिंकली.
कार्यक्रमात जुन्या-नव्या मराठी, हिंदी गीतांचा सुरेल संगम पाहायला मिळाला. प्रत्येक कलाकाराने आपल्या आवाजाच्या जोरावर रंगत वाढवली, तर उपस्थितांनीही टाळ्यांच्या कडकडाटात दाद देत कलाकारांचा उत्साह वाढवला.
या उपक्रमाचे विशेष म्हणजे नवोदित गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सिंगर्स क्लबच्या टीमचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
![]() |
| जाहिरात |









Post a Comment