ऑलंपियाड एक्झाम मध्ये आदर्श ज्ञानपीठाला घवघवीत यश "विद्यार्थ्यांची सुवर्ण पदक मिळवण्याची परंपरा कायम "
खामगाव: स्थानिक घाटपुरी नाका परिसरातील माता सरस्वतीच्या मंदिराजवळील गुणवतेच्या बाबतीत नावारूपास आलेल्या आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे अलीकडेच जाहीर झालेल्या ऑलंपियाड परीक्षेच्या निकालात विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुवर्णपदक संपादित विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण शृंखला कायम ठेवण्यात आदर्श ज्ञानपीठला यश आले आहे. कठोर परिश्रम सातत्यपूर्ण अभ्यास आणि शाळेच्या योग्य नियोजन आणि मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे. वर्गनिहाय पसुवर्णपदक प्राप्त विद्यार्थी आहेत -विराज कवीश्वरसिंह राजपूत, तनुश्री दिलीप शिंपी, हिंदवी राजेश इंगळे, आराध्या निलेश मुर्तुडकर, ग्रीष्म ऋषिकेश टिकार, कोमल लक्ष्मण लांजूडकर,अर्णव कैलास राऊत, देवयांशी सुनील राहणे, पौरवी संतोष पांडव, सार्थक राजू सातव, अर्णव विनोदसिंह परदेसी , कृष्णा मोहन बिडकर, जानवी निरंजन निंभोरकर, आयुष संतोष मात्रे, दर्शन कृष्णा भावसार,हर्षल विजय पळसकर.
![]() |
| जाहिरात |
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कन्हैयासिंह राजपूत सदस्य कवीश्वरसिंह राजपूत मुख्याध्यापिका अनिता पळसकर पर्यवेक्षिका प्रियंका राजपूत ज्येष्ठ शिक्षिका ममता महाजन शिक्षक वर्ग इतर कर्मचारी वर्ग तसेच पालकांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. अनेक विद्यार्थ्यांनी उच्च गुण मिळवत आदर्श ज्ञानपीठाचा नावलौकिक वाढवला आहे.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे विशेष कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पालकांनीही आपल्या मुलांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत संस्थेचे, शाळेचे व शिक्षकांचे आभार मानले.या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून भविष्यातही अशीच यशाची परंपरा कायम राहील असा विश्वास संस्था,शिक्षक व पालक वर्ग यांच्यातर्फे व्यक्त करण्यात आला


Post a Comment