स्वर आशा : स्व. Asha Bhosle यांना भावपूर्ण श्रद्धांजली
खामगाव:- कोल्हटकर स्मारक येथे दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी ‘स्वर आशा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वर्गीय आशा ताई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात आशा ताईंच्या गाण्यांनी झाली. त्यांच्या अजरामर गीतांचा सुरेल आविष्कार सादर करत कु. प्राजक्ता ताई हसबनीस, मुळे ताई, सौ. अनु ताई भडंग, श्रद्धा कुळकर्णी आणि वैष्णवी सोले यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. जुन्या-नव्या गाण्यांची सुंदर सांगड घालत त्यांनी आशा ताईंच्या सुरेल आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमात आशा ताईंनी गायलेल्या सुमारे 12 हजार गाण्यांचा उल्लेख करत त्यांच्या संगीत कारकिर्दीचा गौरव करण्यात आला. सौ. कावडकर मॅडम यांनी आशा ताईंच्या जीवनावर आणि संगीत क्षेत्रातील योगदानावर विस्तृत विश्लेषण केले. तसेच शेखर कुळकर्णी आणि सौ. पूजा तेरेदेसाई यांनीही आशा दीदींबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे स्व. आशा ताई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.


إرسال تعليق