क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त खामगावात शिवसेनेचे भव्य अभिवादन; रॅलीत शिवसैनिकांचा उत्स्फूर्त सहभाग
खामगाव:क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज खामगाव शहरात शिवसेनेच्या वतीने भव्य अभिवादन करण्यात आले. स्थानिक सामान्य जिल्हा रुग्णालय परिसरातील महात्मा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर, समाज बांधवांच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली. शहराच्या प्रमुख मार्गावरून निघालेल्या या रॅलीचा समारोप 'माळी भवन' येथे झाला.
![]() |
| जाहिरात |
या रॅलीमध्ये शिवसेनेच्या वतीने सक्रिय सहभाग नोंदवत महापुरुषांच्या विचारांना उजाळा देण्यात आला. 'जय ज्योती, जय क्रांती' आणि 'महात्मा फुले यांचा विजय असो' अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण शहर परिसर दणाणून गेला होता. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाज बांधवांसोबत खांद्याला खांदा लावून या उपक्रमात सहभाग घेतला आणि महात्मा फुलेंच्या क्रांतीकारी विचारांचा जागर केला.
या रॅलीमध्ये शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संजय अवताडे, हिंदू सेवक ॲड. अमोल अंधारे, तालुका प्रमुख राजेंद्र बघे, शहर प्रमुख चेतन ठोंबरे, उपशहर प्रमुख बंटी पवार, तालुका संघटक सुजित तायडे, महिला आघाडी तालुका प्रमुख सौ. जयश्रीताई देशमुख, युवती शहर प्रमुख श्वेताताई पाटील, विभाग प्रमुख जीवन साळुंखे, संकेत तायडे, रवी माळवंदे, रमेश अवचार यांच्यासह शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


إرسال تعليق