पि.राजा येथील प्राचीन शिव मंदीरात शिवमहापुराण कथेचे आयोजन

खामगाव:- पिंपळगाव राजा येथील पुरातन शिव मंदिर (देवळावाले)येथे शिवमहापुराण कथेचे आयोजन दिनांक १६एप्रिल ते २३ एप्रिल २६ पर्यंत आयोजित करण्यात आले आहे.ह.भ.प. दिलीप महाराज साठे बेलाड यांच्या अमृतवाणीतून कथेचे वाचन होणार आहे.

पिंपळगाव राजा येथील पुरातन असलेले शिव मंदिर पंचकोशीतील असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहे. परमपूज्य पंचमदास महाराज यांनी नाम सप्ताह सुरुवात केली दरवर्षी मंदिरामध्ये उन्हाळ्यात नामसप्ताहाचे आयोजन केल्या  जाते.यावर्षी शिवमहापुराण कथेचे आयोजन गावकऱ्यांनी ठरवले असून दिनांक १६एप्रिल२६ पासून संगीतमय शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ ते दुपारी१२पर्यंत कथेचे पठण होणार असून रात्री८  वाजता भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.संगित साथ व गायक ह.भ.प. प्रविण महाराज हिवाळे, बुर्टी ह.भ.प. अरविंदाभाऊ बोंबटकार,

ह.भ.प. राजीव खंदारे, ह. भ. प. राहुल महाराज वाकेकर, ह. भ. प. उखर्डा सदाफुले तबला वादक ह.भ.प. डिंगाबर महाराज तायडे, मामुलवाडी. ह. भ. प. कैलास महाराज बोबडे ऑरगण वादक :- ह.भ.प. महादेव महाराज विटोकार, निमगांव. ऑक्टोपॅड ह.भ.प. महाराज नांदुरा टाळकरी,  श्री.ह.भ.प. प्रल्हाद सातव, सुधाकर सारभुकन, गजानन बोंबटकार, सुखदेव करागंळे, उमेश बोंबटकार, तुळशिराम वानखडे, उखर्डा सदाफुले, राजाराम तायडे, अनंतराव महाले, एकनाथ निमकर्डे, पप्पुभाऊ रायपुरे, परमेश्वर वानखडे, ओम माकोडे, स्वप्निल सातव, बबलु काळे, रामदास वानखडे, श्रीरामभाऊ वानखडे व पंचक्रोशीतील टाळकरी, विणेकरी व महाराज मंडळी याचे सहकार्य राहील. सप्ताह खंजिरी वादक संदीपपाल महाराज यांचा दिनांक २१एप्रिल २६ रोजी संध्याकाळी स७ ते रात्री १०वाजेपर्यंत  कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी पंचकोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم