वास्तु मटेरीका' नागरिकांसाठी आधुनिक बांधकाम साहित्याची प्रदर्शनी.



  कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर्स (ACCE) खामगांव तर्फे दिनांक '१२ एप्रिल २०२६ रविवार रोजी देवजी खिमजी मंगल कार्यालय,खामगांव' येथे एक दिवशीय प्रदर्शनीचे आयोजन केले आहे. प्रदर्शनीची वेळ सकाळी १०.३० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत राहणार आहे.

     प्रत्येक क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान आणि क्रांतिकारी बदल होत आहेत. इमारत/घर बांधकामाशी संबंधित साहित्य व तंत्रज्ञानाची माहिती सर्वांना व्हावी यासाठी हे आयोजन करण्यात आले आहे. विविध आधुनिक साहित्य जसे टाइल्स, प्लंबिंग, लोखंड, वाटरप्रुफींग इत्यादी. तसेच सोलर पॅनल, सॅनिटरी अप्लायन्सेस, इलेक्ट्रिफिकेशन, इत्यादीं बाबत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान यांचे विविध स्टॉल्स या प्रदर्शनी मध्ये राहणार आहेत. सामान्य माणसाना स्वतःचे घर बांधताना नवीन विविध साहित्य व तंत्रज्ञानाची किमान माहिती असावी या हेतूने एकाच छताखाली सर्व बाबी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने या प्रदर्शनीचे आयोजन केले आहे.

     याशिवाय संघटनेच्या स्थापत्य अभियंत्यांसाठी  तांत्रिक व स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयाच्या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

   या प्रदर्शनीला 'जग्वार अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड' हे प्रमुख आयोजक असून नगरपरिषद, खामगाव कडून सुद्धा विविध योजनेचे स्टॉल लावण्यात येणार आहेत.
खामगाव, नांदुरा, शेगाव, जळगाव जामोद व जिल्ह्यातील अभियंते यांचा सहभाग असून प्रदर्शनी नागरिकांसाठी निशुल्क आहे. तरी नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे 'कन्सल्टंट सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशन खामगांव' तर्फे आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post