अग्रसेन भवन येथे मुलांचा उत्साहपुर्ण समर कॅम्प संपन्न

खामगांव - अग्रवाल महिला व बहु मंडळाच्या वतीने स्थानिक अग्रसेन भवन, बालाजी प्लॉट, खामगांव येथे समर कॅम्प ११ एप्रिल ते १७ एप्रिल पर्यंत आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात योग, नृत्य, फायरलेस कुकींग, कला आणि हस्तकला, बौध्दीक खेळ, संस्कार के धरोवर तसेच सांस्कृतीक मूल्ये आणि परंपरा या विषयावरील सत्रासह विविध उपक्रमांचा समावेश होता.

या शिबीरात एकूण ५० मुलांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला. या नाविण्यपुर्ण उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना शिक्षण, मनोरंजन आणि सांस्कृतिक समृध्दी यांचा एक सुंदर संगम अनुभवता आला. उन्हाळी शिबीराच्या समारोपाच्या वेळी, मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येत होता. शिबीर यशस्वीततेसाठी अग्रवाल महिला मंडळ व बहु मंडळाच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم