पक्षांसह भटक्या पशु व कुत्र्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणाऱ्यांचा होणार सन्मान-सुनिता आयलाणी
खामगाव शहर प्रतिनिधी : उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यात पक्षी तसेच भटक्या गाय, बैल, कुत्र्यांसह मुक्या पाण्याची व्यवस्था करणाऱ्या नागरिकांचा सन्मान करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामागील उद्देश म्हणजे प्राणीमात्रांबद्दल दया आणि मानवतेची भावना जोपासणे हा आहे.दरवर्षी वाढत्या तापमानामुळे भटक्या प्राण्यांना पाण्याअभावी त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत अनेक संवेदनशील नागरिक आपल्या परिसरात पाण्याची भांडी ठेवून या प्राण्यांना दिलासा देतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी दररोज ३०दिवस आपल्या मोबाईल मध्ये फोटो काढून 74477 93009 नंबर वर पाठविणे अनिवार्य आहे.
या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक संदेश जाईल आणि अधिकाधिक नागरिकांनी भटक्या प्राण्यांसाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.“मानवतेचा खरा पुरस्कार” या भावनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन पीपल फॉर एनिमल्स च्या अध्यक्ष सुनीता आयलाणी यांनी केले आहे.


Post a Comment