मातोश्री स्व सौ. सुशिलादेवी जोशी यांच्या पाचव्या पुण्यस्मरणा निमित्त सा.रुग्णालय येथे भोजन वितरण
लॉयन्स क्लब खामगांवच्या वतीने मागील ९ वर्षापासुन लॉयन्स अन्नछ्त्र या नावाने सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असुन दररोज सा.रुग्णालयातील शेकडो रुग्णाना व रुग्णांच्या नातेवाईकांना भोजनाचे वितरण करण्यात येत असते, या माध्यमातुन रुग्णाना मोठा आधार झाला आहे.
![]() |
| जाहिरात |
सराफा भागात राहणारे सामाजिक कार्यकर्ते रवि जोशी यांच्या मातोश्री स्व सौ. सुशिलादेवी कचरुलाल जोशी यांच्या पाचव्या पुण्यस्मरणा निमित्त लॉयन्स अन्नछत्राच्या माध्यमातुन दि. ०६ एप्रिल २०२६ रोजी सा. रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना व रुग्णाना मित्र परिवाराच्या हस्ते भोजन वितरण करण्यात आले. सर्वप्रथम गजानन महाराजांचे पुजन व पुष्पहार अपर्ण करुन गौमातेस गौग्रास लावुन या भोजन वितरणास सुरवात करण्यात आली
![]() |
| Advt. |
यावेळी, ब्राह्मण समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक मोहनलालजी शर्मा,किसनलालजी शर्मा, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे शेखर भाऊ पुरोहित, संजयजी शर्मा, महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे सचिव अँड. उदयजी आपटे, आशिषजी सराफ,डॉ.गौरवजी टिकार,डॉ. गुरुप्रसादजी थेटे, संजयजी बोहरा,योगेशजी (पिंटू) जाधव,मोठी देवी सेवाधारी मंडळाचे रविजी आनंदे, प्रेस क्लब खामगाव चे ईश्वरसिंहजी ठाकूर,खामगाव प्रेस क्लबचे नितेशजी मानकर ,चोपडे साहेब,टिनू एपुरे, निखिल वानखेडे, हेमंत सिंह ठाकुर, जयेश जाधव,रवि जोशी, सौ सुनीता जोशी सह लॉयन्स अन्नछत्राचे लॉ. नरेंद्रसिंहजी छाबरा, लॉ.लोकेश मूंधीयाल,व मित्रपरिवार उपस्थित होते लॉयन्स अन्नछत्राच्या माध्यमातुन अन्नदान करावयाचे असल्यास इच्छुकांनी खालील नंबर वर संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. 9922862701, 9922181285



Post a Comment