हिंदू समाजाचे एकत्रीकरणासाठी सजनपुरीत ‘हिंदू संमेलन’
खामगाव :-हिंदू संमेलन निमित्त आज सजनपुरी येथील कान्होबा वस्तीमध्ये हिंदू समाज एकत्र आणण्याच्या उद्देशाने विशेष संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे प्रमुख वक्ते खामगाव नगर संघचालक प्रल्हाद निमकंडे हे होते.तर अध्यक्ष किशोर चौधरी, अजय निळे मोहन सावरकर, यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी वक्त्यांनी संमेलनातून सामाजिक ऐक्य, संस्कृतीचे जतन आणि संघटन बळकट करण्यावर भर दिला.
हे संमेलन दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी रविवारी सायंकाळी ७ वाजता श्री कान्होबा मंदिर सभामंडप येथे पार पडला. यावेळी परिसरातील सर्व हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.संमेलनाचे संचालन पत्रकार नितेश मानकर यांनी केले.

Post a Comment