समता, बंधुता आणि सामाजिक क्रांतीचा' संदेश देणारे युगपुरुष जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती खामगावात उत्साहात साजरी

खामगाव:'समता, बंधुता आणि सामाजिक क्रांतीचा' संदेश देणारे युगपुरुष जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांची ८९५वी जयंती  रविवार, दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी खामगाव येथे अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. विरशैव लिंगायत समाज खामगावचे अध्यक्ष अजयआप्पा माटे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचे पूजन करून  शहरातील महात्मा बसवेश्वर चौक येथून रॅलीचा प्रारंभ झाला,  छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहिद भगतसिंग, महाराणा प्रताप,व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांना मान्यवराचे हस्ते माल्यार्पण  करण्यात आले महात्मा गांधी उद्यान समारोप येथे झाला. या रॅलीमध्ये लिंगायत समाजातील तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि महिला मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच पुढील कार्यक्रम रुद्रभूमी येथे पार पडला, महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषीक प्रदान करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष अजयआप्पा माटे, महिला उपाध्यक्षा सौ. सुनिताताई पनसकर,सुरेशआप्पा हिंगमिरे जेष्ठ मार्गदर्शक सुरेशआप्पा आवटे, भीमाशंकरआप्पा गोबरे, महादेवआप्पा पनसकर, श्रीमती रत्नप्रभाताई ठेंगझोडे होते विजेत्यामध्ये

 गट अ प्रथम क्र. -कुमारी मनस्वी नितीन आप्पा उकर्डे, द्वितीय क्र. -गौरांग विशाल आप्पा उकर्डे 

 गट ब  प्रथम क्रमांक- सौ राखी विशाल आप्पा उकर्डे, द्वितीय क्रमांक-सौ द्वारकाबाई महादेवआप्पा  पनसकर 

या विजेत्यांना मान्यवरांचे हस्ते बक्षिसे देण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ जयश्री ताई कठाळकर व श्री निखिलआप्पा लाटे यांनी केले. यावेळी विश्व हिंदु परिषदेचे वतीने महात्मा बसवेश्वरांना अभिवादन करण्यात आले,हा संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव २०२६ चे अध्यक्ष सुरेशआप्पा हिंगमिरे, उपाध्यक्ष दिलीपआप्पा सहारकर तसेच कोषाध्यक्ष  मोहनआप्पा पेटकर, नितीन आप्पा तोडकर सौ सुरेखाताई कैलासआप्पा वाणी  अमोल आप्पा आवटे,अक्षयआप्पा शंकरवार, सहकोषाध्यक्ष गणेशआप्पा सावरे,सदस्य विशालआप्पा राजुरकर,  कैलासआप्पा गोबरे, संतोषआप्पा मिटकरी,प्रमोद आप्पा तुपकरी सौ शुभांगी अमोल आप्पा आवटे यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजना खाली हा कार्यक्रम अत्यंत दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. कार्यक्रमाला लिंगायत समाजाचे विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि समाज बांधव, भगिनी उपस्थित होते. बसवेश्वरांच्या 'कायकावे कैलास' या विचारांचे अनुकरण करण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला.


.....


Post a Comment

Previous Post Next Post