युगधर्म पब्लिक स्कूल, खामगावचे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर झळकले

खामगाव – स्थानिक सूर्योदय एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित युगधर्म पब्लिक स्कूल, खामगाव येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत राष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवली आहे.क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावरील स्पर्धांमध्ये युगधर्मच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय स्तरासाठी पात्रता मिळवली आहे.

सोबतच नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत खामगाव शहरासाठी अभिमानाची बाब म्हणजे युगधर्म पब्लिक स्कूल, खामगावच्या इयत्ता ७ वीतील विद्यार्थी कुमार कैवल्य शेलके याने सुवर्णपदक पटकावले. तसेच याच शाळेतील विद्यार्थी कुमार अर्णव देशमुख याने कांस्यपदक मिळवले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष श्री गोपालजी अग्रवाल यांनी पालक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिरुद्ध आवचार यांनी विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करून त्यांच्या यशाचे कौतुक केले.

जाहिरात

यावेळी अध्यक्ष  गोपाल अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना आगामी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. युगधर्म पब्लिक स्कूल, खामगावच्या विद्यार्थ्यांच्या या राज्यस्तरीय यशाचे संपूर्ण खामगाव शहरात कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post