सुरज सिंग ठाकूर यांच्या तत्परतेला नागरिकांचा सलाम!
नागरिकांना वेळेवर पाणी मिळावे यासाठी नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी सुरजसिंह ठाकूर यांनी तत्परता दाखवत मोठी जबाबदारी पार पाडली. बूस्टर पंपावर एक फेज गेल्यामुळे पंप अचानक बंद पडला होता, त्यामुळे पाणीपुरवठा ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
ही बाब लक्षात येताच ठाकूर यांनी रात्रीच महावितरणच्या सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना संपर्क साधून तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले. पहाटे 4 वाजून 47 मिनिटांनी फेज टाकण्यात आला आणि पंप पुन्हा सुरू करण्यात यश आले. त्यामुळे नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा सुरू झाला.
या तत्पर कामगिरीमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जात आहे.


إرسال تعليق