श्री सरस्वती इंग्लिश स्कूल, अंत्रजच्या विद्यार्थ्यांचे – राज्यस्तरीय यश

अंत्रज येथील Shri  Saraswati English School मध्ये महाराष्ट्र शासनाच्या स्किल डेव्हलपमेंट उपक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी कारंजा येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये Abacus, Good Handwriting आणि Phonics या उपक्रमांचा समावेश होता.या स्पर्धांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून उल्लेखनीय यश संपादन केले.

रितेश काळणे राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल ने सन्मानित.




 Abacus स्पर्धेत यशस्वी विद्यार्थी

रितेश पुंडलिक काळणे (इयत्ता ५वी)

वेदिका श्रीकृष्ण रोठे (इयत्ता ४थी)

माही भगवान पाकधाने (इयत्ता ३री)

श्रेया रामदास लांडे (इयत्ता २री)

आराध्या गजानन थोरात (इयत्ता १ली)

 यापैकी रितेश पुंडलिक काळणे याने राज्यस्तरीय स्पर्धेत विशेष यश संपादन केले.

 Good Handwriting उपक्रमात यश

अपूर्वा सतीश इंगळे

वेदिका श्रीकृष्ण रोठे

या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होऊन त्यांना Gold Medal व Certificate देऊन सन्मानित करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शिक्षक व पालकांना देत शाळेमुळेच आम्हाला या स्पर्धांमध्ये सहभागी होता आले, असे सांगितले.

या यशामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांचा बौद्धिक व कौशल्य विकास अधिक बळकट होत आहे. शाळेच्या या उपक्रमांचे व गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

ग्रामीण भागातही शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असून, स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी आता मागे राहणार नाहीत, असे मत संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत चोपडे यांनी व्यक्त केले.

Post a Comment

أحدث أقدم