नगरसेवकांच्या असभ्य वर्तनाविरोधात सफाई कर्मचाऱ्यांचा संताप; पोलीस स्टेशनवर धाव: कारवाईची मागणी
खामगाव नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 12 चे नगरसेवक तहेसीन शहा यांनी मुकादम सुनील उज्जैनवाल यांच्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप समोर आला आहे. या घटनेमुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून संबंधित नगरसेवकांविरोधात कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
या प्रकाराचा निषेध व्यक्त करत सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने शिवाजीनगर पोलीस स्टेशनवर दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी घटनेची सविस्तर माहिती पोलिसांना देत न्याय मिळावा, तसेच अशा प्रकारच्या वर्तनावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. घटने संदर्भात नगरसेवक तहेसीन शहा यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही दरम्यानपोलीस प्रशासनाकडून प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने नगरपरिषद मध्ये रवाना झाले असून मुख्याधिकारी यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

إرسال تعليق