पुणे येथे झालेल्या 9 व्या प्रांतीय सभेत लायन्स क्लब खामगावचा गौरव; विविध पुरस्कारांनी सन्मानित
पुणे येथे संपन्न झालेल्या डिस्ट्रिक्ट 3234 H2 रीजन 1 झोन 1 च्या 9 व्या प्रांतीय सभेत लायन्स क्लब खामगावने उल्लेखनीय यश संपादन करत विविध पुरस्कार पटकावले. क्लबच्या पदाधिकाऱ्यांना व्यक्तिगत तसेच क्लबला मिळून एकूण 4 पारितोषिके मिळाली, तर लिओ क्लब खामगावलाही 2 पुरस्कारांनी गौरविण्यात आले. या यशामुळे खामगावच्या लायन्स परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लायन्स क्लब खामगावचे डिस्ट्रिक्ट पदाधिकारी Ln किशोर गरड यांना खामगाव शहरात ‘हंगर’ उपक्रम प्रभावीपणे राबवून जिल्ह्यातील इतर क्लबना मार्गदर्शन केल्याबद्दल हंगर प्लॅटिनम अवॉर्ड प्रदान करण्यात आला. तसेच Ln तेजस झांबड यांना बेस्ट लायन ऑफ मल्टिपल, तर क्लबचे सचिव Ln गिरीश पवार यांना बेस्ट सेक्रेटरी ऑफ मल्टिपल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लायन्स एक्स्पो यशस्वीपणे आयोजित करून समाजात सकारात्मक प्रतिमा निर्माण केल्याबद्दल बेस्ट इमेज बिल्डिंग अॅक्टिव्हिटी पुरस्कार लायन्स क्लब खामगावला मिळाला.याशिवाय लिओ क्लब खामगावलाही बेस्ट लिओ प्रेसिडेंट आणि बेस्ट लिओ सेक्रेटरी असे दोन मानाचे पुरस्कार मिळाले. या सर्व यशाबद्दल लायन्स क्लब खामगावतर्फे तसेच PST 25-26 तर्फे सर्व पुरस्कार विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

إرسال تعليق