खामगावमध्ये भाजपचा जल्लोष; तीन राज्यांतील विजयाचा उत्सव उत्साहात साजरा
खामगाव (नितेश मानकर): देशातील तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर खामगाव शहरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. शहरातील प्रमुख चौकात मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्र येत विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी मंत्री आकाश फुंडकर यांनीही कार्यकर्त्यांसोबत ठेका धरत नृत्य करत उत्सवात सहभाग नोंदवला. यावेळी“भाजपचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
कार्यकर्त्यांकडून नागरिकांना मोतीचूर लाडू व फराळाचे वाटप करण्यात आले. याशिवाय फटाक्यांची आतषबाजी करत विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. अनेकांनी एकमेकांना मिठाई भरवत अभिनंदन केले. या जल्लोषामुळे काही काळ परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. भाजपच्या या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी निवडणुकांसाठीही आत्मविश्वास वाढल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली.


إرسال تعليق