खामगावात अवैध दारू वाहतुकीवर कारवाई; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

खामगाव : शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे शोध पथकाने अवैध दारू वाहतुकीवर कारवाई करत एका आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 28 मे 2026) रोजी बर्डलॉट परिसरात करण्यात आली.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,सपोनि पुरी. पोहेकॉ संदिप टाकसाळ , पोहेकॉ निलसिंग चव्हाण, पोहेकॉ देवेंद्र शेळके , पोकॉ प्रविण गायकवाड , पोकॉ केशव झ्याटे  मपोकॉ पल्लवी बोर्डे पाटील ,पोलीस कॉन्स्टेबल केशव झाटे हे पथकासह पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम पांढऱ्या रंगाच्या ई-बाईकवर दारूची वाहतूक करत जुना हायवे मार्गाने येत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष सापळा रचून नाकाबंदी केली. दरम्यान, एमएच 28 बीवाय 6276 क्रमांकाच्या ई-बाईकवरून येणाऱ्या संशयितास थांबवून चौकशी करण्यात आली.

चौकशीदरम्यान आरोपीने आपले नाव सोनू लक्ष्मण ठाकूर (वय 40, रा. सतीफैल, खामगाव) असे सांगितले. त्याच्या ताब्यातील बॅगेची झडती घेतली असता देशी-विदेशी दारूचा साठा आढळून आला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 (ई)(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post