खामगावात छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य मोटारसायकल रॅली; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

मराठा पाटील युवक समितीच्या आयोजनाचे कौतुक

खामगाव : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठा पाटील युवक समितीच्या वतीने आज खामगाव शहरात भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीला नागरिकांसह महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या शिवप्रेमींनी भगवे झेंडे फडकावत आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला.


ही भव्य मोटारसायकल रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत होती. रॅलीदरम्यान “जय संभाजी, जय शिवराय” अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेत छत्रपती संभाजी महाराजांप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली.

रॅलीमुळे शहरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी विविध ठिकाणी उभे राहून रॅलीचे स्वागत केले. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश जनमानसात पोहोचवण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.



Post a Comment

أحدث أقدم