शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा: रक्तदात्यांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावे...सुरजभैय्या यादव


खामगांव :- शासकीय रक्तपेढी मध्ये रक्ताचा तुटवडा असल्याने एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशन कडून गरजू गरीब रुग्णांना रक्तदान करून रक्त पुरवठा करण्यात आला. सध्या शासकीय रक्तपेढी मध्ये रक्ताचा भयंकर तुटवडा आहे रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे असे आवाहन रक्तमित्र सुरजभैय्या यादव यांनी केले.  गेल्या पंधरा दिवसात गरजूला रुग्णाला एकनिष्ठा रक्तदाते दुर्मिळ रक्तगट रोहीत पहूरकर, गणेश आमले, गणेश कोळसे, लक्ष्मण कंडारकर, गोपनीय रक्तदाता पॉजिटीव्ह रक्तदाते दिपक राऊत, योगेश आळेकर, गोपालभाऊ पारखे, भारत पंजवाणी, गोपाल दायमा, हॅप्पी गाडोदिया, अमोल गव्हांदे, अजीम खान, आकाश घ्यारे, विजय सिरसाट, दिपक आसेरकर,  विनोद पवार,  निखिल हजारे, राहुल पारखे, गजानन लाड, धनंजय कार्डेकर, राहुल पारखे, आदि लोकांनी रक्तदान केले. शासकीय रकतपेढीचे रक्तसंक्रमण अधिकारी सौ. प्रणाली देशमुख, टेक्निशियन सौ. सपना कांबळे, सौ. चित्रा देशपांडे, सौ. राजश्री सावके, मेघा इंगळे, राम अंभोरे, परिचारीका भारती काळे एकनिष्ठा फाउंडेशनचे सुरजभैय्या यादव, आकाश गव्हांदे, वैभव कापडे, सौरव पदमने, हर्षल इंगळे, विठ्ठल दुतोंडे, नागोराव भातुरकर आदींचे सहकार्य लाभले अशी माहिती वैभव कापडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.



Post a Comment

Previous Post Next Post