छत्रपती शिवाजी महाराज नगरपरिषद मराठी शाळा क्र.2 मध्ये उन्हाळी शिबिराचा समारोप
खामगाव: छत्रपती शिवाजी महाराज नगरपरिषद मराठी शाळा क्र.2सतिफैल मध्ये उन्हाळी शिबिराचा समारोपकीय कार्यक्रम संपन्न झाला.
विद्यार्थी मोबाईल पासून दूर राहावे व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने मराठी शाळा क्रमांक दोन मध्ये समर कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले होते.यामध्ये लाठीकाठी, योगासने,प्राणायाम लेझीम तसेच मल्लखांब रोप मल्लखांब चे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण वर्गामध्ये योगा प्रशिक्षक म्हणून श्री एन. के. देशमुख सर, श्री जितेंद्र ठाकूर सर,कु. श्रुती आटोळे, कु. राजनंदिनी राठोड यांनी मुलांना अतिशय उत्तम योगासन व प्राणायाम चे प्रशिक्षण दिले. श्रीकृष्ण ताकवाले सर, गोलाईत सर, उमेश कदम सर यांनी मुलांचा मल्लखांब वर उत्तम सराव घेतला. अनेक मुलींनी रोप मल्लखांब चे अतिशय उत्तम प्रशिक्षण प्रकाश पवार सर यांच्याकडून मिळवले. कु. सृष्टी श्रीवास्तव व हरीश रेठेकर यांनी लेझीम व लाठीकाठी चे उत्तम प्रशिक्षण दिले. श्री जगताप सर यांनी जिम्नॅस्टिकचा उत्तम सराव विद्यार्थ्यांकडून करून घेतला.
सात दिवसाचे उत्तम प्रशिक्षण घेतल्यानंतर दिनांक 7 मे 2026 ला शाळेत समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये खामगाव चे तालुका क्रीडा अधिकारी श्री यादव साहेब, खामगाव नगरपालिकेच्या शिक्षण सभापती सौ स्नेहलताई गरड , आरोग्य सभापती श्री प्रवीण भाऊ कदम, उपमुख्याधिकारी श्री आनंद देवकते, खामगाव नगरपालिकेचे नगरसेवक श्री राम भैया मिश्रा, सौ. लक्ष्मीताई मिश्रा, श्री कृष्णा भाऊ ठाकूर, श्री विजय पदमगिरवार, नगरपालिका शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर राठोड, ह.भ. प.श्री मनसुटे सर यांची अनमोल उपस्थिती लाभली. प्रशिक्षण कालावधीमध्ये खामगाव शहरातील अनेक गणमान्य पदाधिकारी यांनी भेटी दिल्या व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. खामगाव शहरातून विविध खाजगी शाळांचे विद्यार्थी सुद्धा या प्रशिक्षणामध्ये सहभागी झाले होते यामध्ये जवळपास 100 विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. खामगाव शहरातील गोरगरीब विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षणाचा लाभ व्हावा यासाठी या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. नगरपालिकेच्या शाळेने राबविलेल्या या समर कॅम्पचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे. सर्व पालकांनी, पदाधिकाऱ्यांनी या कॅम्प बद्दल समाधान व्यक्त केले. या प्रशिक्षण शिबिरामध्ये श्री पवन गरड श्री कृष्णा भाऊ ठाकूर, श्री राम भाऊ मिश्रा,श्री हरीश भाऊ रेठेकर, श्री जितेंद्र ठाकूर सर,श्री रवी तिवारी, श्री गणेश भाऊ जाधव या सर्व मंडळींनी विद्यार्थ्यांसाठी उत्तम नाश्त्याची व्यवस्था केली.श्री कृष्णा भाऊ ठाकूर व पवनभाऊ गरड यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र त्यांच्याकडून देण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील खरात सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश यादव, प्रकाश पवार सर,राजूभाऊ हिवराळे,सागर पाटील, श्री गणेश जाधव सर, अश्विनी माने मॅडम,यादव मॅडम, आनंदे मॅडम व सर्व शिक्षक वृंद यांनी प्रचंड मेहनत घेतली.

Post a Comment