खामगाव डम्पिंग ग्राउंडला पुन्हा आग; दोन जेसीबी व दोन अग्निशमन वाहने आग विझविण्यासाठी कार्यरत
खामगाव शहरालगत असलेल्या डम्पिंग ग्राउंडला आज दुपार दरम्यान पुन्हा एकदा आग लागली. माहिती मिळतात अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कचऱ्याचे ढिगारे हटवून आग नियंत्रणात आणण्यासाठी दोन जेसीबी यंत्रणाही कार्यरत करण्यात आले आहेत .
डम्पिंग ग्राउंडमधून सतत धूर निघत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या धुरामुळे श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ आणि प्रदूषणात वाढ होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.
वारंवार लागणाऱ्या आगीमुळे आणि धुराच्या समस्येमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून प्रशासनाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे. या घटनेमुळे शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.

إرسال تعليق