महामहीम द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते जनार्दन बोथे गुरुजी यांना प्रतिष्ठेचा ‘पद्मश्री’ नागरी सन्मान प्रदान
नितेश मानकर अजय निळे खामगाव
जनोपचार न्यूज नेटवर्क:- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा आणि सेवाभावाचा वारसा कृतीतून जपणारे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस तथा ज्येष्ठ गुरुदेव भक्त श्री जनार्दन बोथे गुरुजी यांना देशातील प्रतिष्ठेचा ‘पद्मश्री’ नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आल्याने संपूर्ण विदर्भासह गुरुदेव सेवा मंडळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सहवासात घडलेल्या बोथे गुरुजींनी आयुष्यभर समाजप्रबोधन, ग्रामविकास, व्यसनमुक्ती, संस्कार निर्माण आणि राष्ट्रसेवेचे कार्य अखंडपणे केले. ग्रामीण भागात सेवा, संस्कार आणि मानवतेची शिकवण पोहोचविण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून मिळालेला ‘पद्मश्री’ पुरस्कार हा संपूर्ण विदर्भासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. विविध स्तरांतून बोथे गुरुजींवर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या कार्याला सलाम व्यक्त केला जात आहे.

إرسال تعليق