अज्ञात वाहनाच्या धडकेत पदचारी जागीच ठार; ओम साई फाउंडेशनचे तत्काळ मदतकार्य

खामगाव, प्रतिनिधी : खामगाव-नांदुरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर चिखली फाट्याजवळ मंगळवार, दि. 30 जून 2026 रोजी रात्री सुमारे 11.30 वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनाने एका पदचाऱ्याला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला.

या घटनेची माहिती रमेश मोरे यांनी ओम साई फाउंडेशनला दिल्यानंतर फाउंडेशनचे स्वयंसेवक तातडीने रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले. स्वयंसेवक विलास निंबोळकर, अश्विन फेरण, कृष्णा वसोकार तसेच पोलीस कर्मचारी सचिन बावणे यांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य केले व पुढील आवश्यक कार्यवाहीस सहकार्य केले.

या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला असून अज्ञात वाहनाचा शोध घेण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post