अधिक जेष्ठ मास निमित्त श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ व श्री पुरूषोत्तम सहस्त्रनाम महायज्ञ

खामगांव - श्री यमुना महिला सत्संग मंडळ तथा श्री मदनमोहन मंदीर खामगांव द्वारे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ तथा श्री पुरूषोत्तम सहस्त्रनाम महायज्ञाचे आयोजन स्थानिक श्री देवजी खिमजी मंगल कार्यालय खामगांव येथे आयोजीत करण्यात आले आहे.

श्रीमद् भागवत कथा दि. ६.६.२०२६ ते दि. १२.६.२०२६ पर्यंत राहील तसेच श्री पुरूषोत्तम सहस्त्रनाम महायज्ञ दि. १३.६.२०२६ रोजी राहणार आहे. कथा प.पु.गोस्वामी १०८ श्री वागधीशरायजी महोदयश्री (विशालबाबा) चेन्नई यांच्या अध्यक्षतेखाली व कथा वाचन वेदांताचार्य श्री गिरीराजजी शास्त्री बडौदा हे करतील. कथेची वेळ दररोज दुपारी ३ ते ७वाजेपर्यंत राहील. दि.१३.६.२०२६ रोजी श्री पुरूषोत्तम सहस्त्रनाम महायज्ञ आयोजन करण्यात आले आले या महायज्ञाचे मुख्य सेवार्थी श्री रमेशचंद्र लक्ष्मीनारायणजी राठी हे राहतील.


अधिक जेष्ठ मास निमित्त श्री मदनमोहन मंदिर हवेली सराफा खामगाव येथे विविध मनोरथाचे दर्शन भागवत संपल्यानंतर राहील. शोभायात्रा शनिवार दि. ६.६.२०२६ सकाळी ९ वाजता श्री मदनमोहन मंदीर पासुन सुरूवात होणार आहे. यावेळी व्यास पुजन तथा कथा प्रारंभ, परिक्षीत संवाद, नृसिंह अवतार, वामन अवतार, राम जन्मोत्सव, कृष्ण जन्मोत्सव, श्री गिरीराजजी उत्सव, श्रीकृष्ण रूख्मीनी विवाह, श्री सुदामा चरित्र, श्री पुरूषोत्तम सहस्त्र नाम महायज्ञ आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

अधिक माहितीकरीता नंदकिशोर गोयनका, सतिषभाई सांगाणी, उमेशभाई बरालीया, सौ. निशा कृष्णकांत भट्टड, सौ. चंचल प्रमोद चांडक, सौ. ममता विपुल जोबनपुत्रा यांच्याशी संपर्क साधावा. वरील कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री यमुना महिला सत्संग मंडळ व श्री मदनमोहन मंदीर हवेली खामगांव तर्फे करण्यात आले आहे. उपरोक्त माहिती राजकुमार गोयनका यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

Post a Comment

أحدث أقدم