लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार मुलास नोकरी द्या; अन्यथा आत्मदहनाचा इशारा

खामगाव येथील सेवानिवृत्त सफाई कामगार चंद्रकुमार छगन आठवले यांनी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा यांना निवेदन देत आपल्या रिक्त जागेवर लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार मुलाला तात्काळ नियुक्ती देण्याची मागणी केली आहे. आठवले हे 31 मार्च 2021 रोजी सेवानिवृत्त झाले असून जवळपास सहा वर्षांचा कालावधी उलटूनही त्यांच्या मुलाला अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी निवेदनात केला आहे. याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

आपली आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे. त्यामुळे लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार त्यांच्या मुलाला 30 दिवसांच्या आत नियुक्ती द्यावी, अन्यथा 6 जुलै 2026 रोजी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. तसेच या घटनेतून उद्भवणाऱ्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم