पत्रकारांशी सुसंवादातून समाजहिताच्या प्रश्नांवर चर्चा
शिवसेनेच्या वतीने चर्चासत्र व स्नेहभोजन उत्साहात संपन्न
खामगाव – शिवसेना खामगावच्या वतीने पत्रकार बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेले चर्चासत्र व स्नेहभोजनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शिवसेनाचे विदर्भ प्रमुख ऋषी जाधव तसेच नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अॅड. अमोल अंधारे व राजेंद्र बघे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात पत्रकारांशी विविध सामाजिक, विकासात्मक आणि जनहिताच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी अॅड. अमोल अंधारे यांनी पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत असल्याचे सांगितले. पत्रकार आणि लोकप्रतिनिधी यांच्यात सातत्याने संवाद राहिल्यास जनतेच्या समस्या प्रभावीपणे शासनापर्यंत पोहोचविणे अधिक सोपे होते, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात उपस्थित पत्रकारांनीही विविध स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि नागरिकांच्या अपेक्षांबाबत आपली मते मांडली. त्यानंतर सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे पत्रकार आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये स्नेह व संवाद अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच खामगाव शहर व परिसरातील अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

إرسال تعليق