NCC राज्यस्तरीय स्पर्धेत जय पाचपोर यांची सुवर्ण कामगिरी; मंडळाच्या वतीने सत्कार
खामगाव शहरातील सुटाळपुरा परिसरातील स्व चंद्रकांत पाचपोर यांचे चिरंजीव जय चंद्रकांत पाचपोर याने अमरावती येथे आयोजित 13 व्या महाराष्ट्र राज्य NCC शूटिंग स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. स्पर्धेतील स्पीचिंग आणि डिसिप्लिन या विभागांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत जय याने सुवर्ण (Gold) आणि रौप्य (Silver) पदकांवर आपले नाव कोरले. त्यांच्या या यशामुळे खामगाव शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
जय च्या या यशाबद्दल जय भवानी नवरात्री उत्सव मंडळ आणि जय गजानन नवयुग दल यांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जय ला पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. भविष्यातही अशाच प्रकारे प्रगती करून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवावे, अशा शुभेच्छा उपस्थितांनी व्यक्त केल्या. जय यांच्या यशामुळे परिसरातील युवकांना प्रेरणा मिळत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

إرسال تعليق