लॉ राजकुमार गोयनका संपादित लॉयन्स डिस्टिक डिरेक्टरी "कलर ऑफ काइंडनेस" चे थाटात विमोचन 

अकोला(नितेश मानकर) येथील आरजी इंटरनॅशनल हॉटेलच्या सभागृहात रविवारी 28 /06/2026 ला सकाळी 10.00 वाजता पार पडलेल्या प्रांत 3234 एच 2 च्या अधिवेशनामध्ये लॉयन्स डिस्टिक डिरेक्टरी  "कलर ऑफ काइंडनेस"  चे विमोचन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. या डिरेक्टरीचे मुख्य संपादक, एम जे एफ  लॉ राजकुमार गोयनका डिस्टिक पब्लिक रिलेशन ऑफिसर यांनी केले असून, लायन्स क्लबच्या इतिहासामध्ये  परिपूर्ण अशी इंटरनॅशनल ची माहिती असलेली डिरेक्टरी प्रथमच प्रकाशित झालेली आहे. या डिरेक्टरी चे सर्व स्तरातून अतिशय कौतुक होत आहे, याप्रसंगी  प्रांतपाल लॉ अश्विनकुमार बजोरिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सोहळ्याला उपप्रांतपाल  लॉयन योगेश जयस्वाल, द्वितीय उपप्रांतपाल लॉयन सुप्रिया कोतवाल माजी प्रांतपाल लॉयन गिरीश सिसोदिया प्रांतीय सेक्रेटरी लॉयन डॉक्टर प्रदीप गर्गे डिस्टिक ट्रेझरर लॉयन डॉक्टर कैलाश मुरारका  डिस्टिक फर्स्ट लेडी लॉ वैशाली बजोरिया लॉ नरेश चोपडा व   मुख्य संपादक लॉ राजकुमार गोयनका आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post