सिल्वरसिटी मल्टिस्पेसिऍलिटी हॉस्पिटल मध्ये डॉक्टर्स डे उत्साहात साजरा
"सिल्वरसिटी जीवनगौरव पुरस्काराचे वितरण.."
सिल्वरसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, क्रिटिकल केअर व ट्रामा सेंटर, जलंब रोड, खामगाव येथे आज दि १ जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी मंच्यावर सिल्वरसिटी हॉस्पिटल चे अध्यक्ष डॉ अशोक बावस्कर, व्यवस्थापकीय संचालक डॉ पंकज मंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पराग महाजन, संचालक डॉ प्रशांत कावडकर, डॉ निलेश तिबडेवाल, डॉ भगतसिंग राजपूत, डॉ गौरव गोयनका, डॉ आनंद राठी, डॉ राजेंद्र गोठी, डॉ गुरुप्रसाद थेटे, डॉ गिरीश पवार, डॉ ब्रह्मानंद टाले, सत्कार डॉ रमेश काळपांडे व डॉ सौ मंगला काळपांडे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे हस्ते द्विप प्रज्वलन व धंवन्तरी पुजानाने करण्यात आली. व्यवस्थापकीय संचालक डॉ पंकज मंत्री यांनी कार्यक्रमाचे प्रस्तविक केले. डॉक्टर डे चे औचित्य साधून सिल्वरसिटी हॉस्पिटल खामगाव चे भागधारक जळगाव जामोद येथील प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ रमेश काळपांडे यांचा शाल, श्रीफळ, हार व सिल्वरसिटी जीवनगौरव पुरस्कार स्मृती चिन्ह देऊन सपत्नीक सत्कार हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ अशोक बावस्कर व इतर सर्व मान्यवराचे हस्ते करण्यात आला. सत्कार मूर्ती चा परिचय मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पराग महाजन यांनी दिला. तदनंतर हॉस्पिटल चे सर्व संचालक वृंद, भाग धारक डाक्टर्स, हॉस्पिटल मध्ये कार्यरत सर्व डॉक्टर्स यांचा गुलाब पुष्प व भेट वस्तू देऊन डॉक्टर्स डे निमित्त सत्कार करण्यात आला.. सत्कारास उत्तर देतांना डॉ रमेश काळपांडे यांनी आपल्या खडतर प्रवासची माहिती दिली व सिल्वरसिटी हॉस्पिटल ने दिलेल्या पुरस्काराने भारावून गेल्याचे सांगितले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ अशोक बावस्कर यांनी डॉक्टर्स डे चे महत्व व भारतरत्न डॉ भिधान चंद्र रे यांच्या बद्दल माहिती दिली.संचालक डॉ आनंद राठी यांन्नी उपस्थितीतांचे आभार मानले. या कार्यक्रमा सोबतच हॉस्पिटल मधील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डॉ जुनेद , डॉ पंकज, डॉ अजय व डॉ श्रुती काळे या निवासी डॉक्टरांचा प्रशस्तिपत्र व अवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचलन संचालक डॉ गौरव गोयनका यांनी केले. या कार्यक्रमांस डॉ सुरेश शिरसाट, डॉ दिपाली सुरूशे, डॉ रविन्द्र वराडे, डॉ छाजेड, डॉ विमल दुगड, डॉ सौ वैशाली चरखा, डॉ सौ अपर्णा बावस्कर, डॉ सौ दीपा मंत्री, डॉ सौ रुपाली महाजन, डॉ सौ मंजुश्री तिबडेवाल, डॉ सौ मंजुषा महाले, डॉ सौ उज्ज्वला पवार, डॉ आयन हुसेन, डॉ सौ पूजा तेरेदेसाई व इतर सर्व डॉक्टर्स मंडळीची सहकुटुंब उपस्थिती होती तसेच हॉस्पिटल चे सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हॉस्पिटल चे सुपरवाईजर श्री राजेश साटोटे, सुपरवाईजर अभिषेक, ऑफिस स्टाफ सौ विद्या रिसेप्शनिस्ट सौ जया इंगळे तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पराग महाजन यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे..


Post a Comment