शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तसेच सोयाबीन बीज उत्पादक कंपनीवर कार्यवाही करा- भाजपाची मागणी
खामगांव शेगांव तालुक्यातील अनेक गावांमध्ये हजारो शेतकऱ्यांनी सोयाबीन बीयाणे पेरले परंतु पुरेसा पाऊस पडूनही शेकडो शेतकऱ्यांच्या शेतातील बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे आज दि.०९/०७/२०२६ रोजी भाजपाच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच या बीज उत्पादक कंपन्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी तहसिलदार व उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या मार्फत मा.ना.श्री दत्ताजी भरणे, कृषी मंत्री व ना ॲड आकाशदादा फुंडकर कामगार मंत्री तथा आमदार खामगांव विधानसभा मतदार संघ यांना भारतीय जनता पार्टी खामगांवच्या वतीने निवेदन देण्यात आले.
खामगांव शेगांव तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सोयाबीनचा पेरणा केला परंतु पुरेसा पाऊस पडूनही सोयाबीनचे बियाणे उगवले नाही. यामुळे शेकडो शेतकऱ्यांच्या शेकडो हेक्टर वरील सोयाबीनचा पेरा वाया गेला असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा निकृष्ट बियाण्यांबाबत संबंधीत कृषी केंद्राकडे बियाणे बदलवून मागण्यास शेतकरी गेले असता त्यांनी बियाणे बदलवून देण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. शेतकऱ्यांच्या मागणीला वाचा फोडण्यासाठी भारतीय जनता पार्टी खामगांव तर्फे आज दि. ९ जुलै २०२६ रोजी उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या मार्फत मा.ना.श्री दत्ताजी भरणे, कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य यांना तसेच तहसिलदार खामगांव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष नरेंद्र शिंगोट, श्यामसुंदर पाटेखेडे, तसचे भाजपा पदाधिकारी राजेश तेलंग, चेतन फुंडकर, महादेव देशमुख, प्रदिप हरमकार, नंदकिशोर टिकार, राजेश टिकार, दत्तात्रय टिकार,प्रविण टिकार, विठठल अंभोरे, वैभव ढोरे, भगवानसिंग सोळंके, शालीकराम राठोड, युवराज मोरे, मुरलीधर दळवी, योगेश राऊत, दादाराव चव्हाण यांची उपस्थिती होती.

إرسال تعليق