खामगाव, दि. 20 जुलै : खामगाव तालुक्यातील पारखेड शिवारात एका हृदयद्रावक घटनेत बाप-लेकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद (मर्ग क्र. 40/2026) करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारखेड येथील संतोष हरिचंद्र गावंडे व त्यांचा मुलगा अक्षय उर्फ विठ्ठल संतोष गावंडे यांनी शेतातील कांदा चाळीत गळफास घेऊन जीवन संपविले. प्राथमिक माहितीनुसार, सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि त्यातून आलेल्या मानसिक तणावामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा उल्लेख फिर्यादी गोपाळ पंढरी गावंडे यांनी दिलेल्या माहितीत करण्यात आला आहे.

या घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येमागील नेमकी कारणे आणि इतर सर्व बाबींचा तपास पोलीस करीत आहेत. मृत्यूची बातमी समजताच पारखेड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

أحدث أقدم