लायन्स क्लब खामगाव संस्कृतीतर्फे वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन उपक्रम उत्साहात संपन्न
खामगाव, दि. 21 जुलै : लायन्स क्लब खामगाव संस्कृतीच्या वतीने जागतिक पर्यावरण अभियानांतर्गत स्वर्दन्या कॉन्व्हेंट स्कूल, रोहणा येथे वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमामध्ये २१ वृक्षांचे वितरण व वृक्षारोपण करण्यात आले. तसेच पर्यावरण संवर्धनाबरोबरच पक्षी संरक्षणाचा संदेश देण्यासाठी २१ चिमणी घरटी बसविण्यात आली.
या कार्यक्रमास लायन नरेश चोपडा, उज्ज्वला उमरकर, विरेंद्र शाह, डिंपल विरेंद्र शाह व संजय उमरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शाळेचे अध्यक्ष जगताप सर, संजय गुरव सर, प्राचार्या इंगोले मॅडम, संदेश गुरव, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला.
वृक्षारोपण प्रकल्पासाठी संजय गुरव यांनी विशेष सहकार्य व प्रायोजकत्व दिले. पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि पक्षी संवर्धनासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी मनापासून कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा प्रशासन, शिक्षक, विद्यार्थी, सर्व लायन्स सदस्य तसेच सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले. या वृत्ताचे प्रसिद्धीकरण लायन्स क्लब खामगाव संस्कृतीचे पीआरओ राजकुमार गोयनका यांनी केले.

Post a Comment