खामगावात १२ जुलै रोजी भव्य 'युवा संगम'चे आयोजन

खामगाव (नितेश मानकर) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त खामगाव नगर व खंड यांच्या वतीने १६ ते ३५ वर्षे वयोगटातील युवकांसाठी 'युवा संगम' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, १२ जुलै २०२६ रोजी दुपारी १ ते ५ या वेळेत श्री हरी लॉन्स, सुटाळा बु., खामगाव येथे होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते नितीन जांभोरकर, नागपूर यांची उपस्थिती राहणार आहे.  
राष्ट्रनिर्माणात युवकांचा सक्रिय सहभाग वाढावा, नेतृत्वगुणांचा विकास व्हावा तसेच राष्ट्र, समाज आणि संस्कृतीविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमात साहसिक खेळ, संघ परिचय, विविध राष्ट्रीय सामाजिक व सांस्कृतिक विषयावरील संवाद, प्रेरणादायी मार्गदर्शन, तसेच राष्ट्र प्रथम भाव जागरण व संकल्प असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या माध्यमातून युवकांना विचारांची दिशा, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रकार्यात सहभागी होण्याची प्रेरणा मिळणार आहे.
या कार्यक्रमासाठी १६ ते ३५ वयोगटातील सर्व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, तसेच QR कोडद्वारे नोंदणी करून आपला सहभाग निश्चित करावा, 


असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, खामगाव नगर व खंड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم